Our Schools

शिशुवृंद सी.डी.ओ.मेरी हायस्कूल (मराठी)

स्थापना – १९८३
विद्यार्थीनी संख्या – ३८९
शिक्षक – ५
शिक्षकतर कर्मचारी – २
वर्गसंख्या – ५

शिशुवृंद सी.डी.ओ.मेरी शाळा १९८३ पासून सुरू झाली. त्यावेळी शाळेत खूपच कमी विद्यार्थी होते. शिक्षकांनी घरोघरी फिरून विद्यार्थी गोळा केले. नंतर शाळेत विद्यार्थी संख्या वाढली तसेच वर्ग संख्याही वाढली.आज येथे पाच वर्ग आहेत. दोन लहान गट व तीन मोठे गट आहेत. शाळेत मुलांना खेळण्यायोग्य व अभ्यासक्रमाला योग्य अशी खेळणी आहेत. खेळण्याद्वारे मुलांच्या मनात अभ्यासूवृत्ती निर्माण केली जाते.


मुलींची प्राथमिक व शिशुवृंद शाळा (मराठी), नाशिकरोड

स्थापना – १९९०
विद्यार्थीनी संख्या – २५०
शिक्षक – ५
शिक्षकेतर कर्मचारी – १
वर्गसंख्या – ५

सन १९९३ मध्ये संस्थेने मुलींची प्राथमिक शाळा शेठ ध.सा.कोठारी कन्या शाळेच्या इमारतीत सुरू केली. प्रारंभी सौ.शालिनी कुलकर्णी यांनी अधिक्षिका म्हणून काम पाहिले. सौ. नलिनी देशपांडे या पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. लहानपणापासूनच मुलींवर संस्कार व्हावेत म्हणून थोर पुरूषांचे जन्मदिन, स्मृतीदिन साजरे केले जातात. ‘बालसभा’ हे या शाळेचे एक वैशिष्टय आहे. हे सर्व उपक्रम यशस्वी व्हावेत म्हणून ‘मातामंडळ’ नेहमीच सहकार्य करीत असते. यातूनच पालकांचा परिचय होतो.