Our Schools

सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर, नाशिक

स्थापना – १९३८
विद्यार्थीनी संख्या – ३४०८
शिक्षक – ४८
शिक्षकेतर कर्मचारी – १
वर्गसंख्या – ४८


नाशिकमधील ऐतिहासिक अशा राजेबहादूर वाडयात चालणारी, नाशिक एज्युकेशन सोसायटीची अत्यंत नावाजलेली व राज्यातील सर्वात मोठी प्राथमिक शाळा. या वास्तूतून वि. वा. शिरवाकरांपासून अनेक नामवंत ज्ञानार्जन करीत पुढे आले आहेत. सन १९३८ मध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीने प्राथमिक शिक्षण मंदिर या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. प्रांरभी चार नाशिक जिल्ह्यातील ही मुलांची सर्वात मोठी शाळा असून येथील विद्यार्थी शालांत परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा यांमध्ये प्रतिवर्षी गुणवत्ता यादीत चमकतात.


प्राथमिक विद्यालय, सिडको स्कीम-४, नाशिक


स्थापना – १९८७
विद्यार्थीनी संख्या – १५००
शिक्षक – २९
शिक्षकेतर कर्मचारी – १
वर्गसंख्या – २८

सिडको परिसरातील प्रसिध्द प्राथमिक शाळा. सन १९८७ मध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीने सिडको येथील सर्व सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त क्रिडागंण लाभलेली इमारत विकत घेतली व या शाळेचे भाग्य असे की नव्या सुंदर इमारतीतील प्रवेशाने प्राथमिक विद्यालयास सुरूवात झाली. १९८७ मध्ये वर्गसंख्या १७ व विद्यार्थीसंख्या ९७० होती. १९९१ पासून आजपर्यंत २८ वर्ग आहेत व १४८१ विद्यार्थी प्रशिक्षित अध्यापकांकडून मार्गदर्शन घेत आहेत. या शाळेच एक कौतुकास्पद कार्य म्हणजे या शाळेतील शिक्षक गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा सर्व खर्च देतात. आज पाच शिक्षकांनी असे विद्यार्थी दत्तक घेतले असून सामाजिक ऋणातून मुक्त होण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे.


इंग्लिश मिडीयम प्रायमरी माँटेसरी स्कूल, सिडको-४, नाशिक


स्थापना – १९६८
विद्यार्थी-विद्यार्थीनी संख्या – ४११
शिक्षक – १२
शिक्षकेतर कर्मचारी – १
वर्गसंख्या – १५

इंग्रजी माध्यमाची परंतु मराठी संस्कार जपणारी एक शाळा असावी या विचारातून शाळेची स्थापना झाली. ना.ए. सोसायटीने शाळा सुरू केली. राजेबहाद्दर वाडयात काही वर्ग मिळाले व शाळेची सुरूवात झाली. इंग्रजी माध्यमातून माँटेसरी स्तरावर शिक्षण देणारी ही शाळाही आपल्या वैशिष्टयपूर्ण उपक्रमांनी लोकप्रिय झालेली आहे.