Our Schools

आश्रमशाळा वेळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक

(प्राथमिक विभाग व माध्यमिक विभाग)

नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षात सामाजिक ऋणाची जाणिव व शैक्षणिक आव्हाने स्वीकारण्याची वृत्ती यातून संस्थेने एका अगदी वेगळया शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले. ‘भगीरथ प्रकल्प’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संस्थेने वेळुंजे गावातील आश्रमशाळा चालविण्यास घेतली. या आश्रमशाळेत १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग असून एकूण विद्यार्थी संख्या ३१९ इतकी आहे. कर्मचारी वृंदात ६ प्राथमिक शिक्षक, १ अधिक्षक, ३ स्वयंपाकी, १ कामासाठी हे कार्यरत आहेत.


एम. एस. कोठारी अँकेडमी, नाशिक


एम. एस. कोठारी अँकेडमी ही सी. बी. एस. सी. अभ्यासक्रमाची शाळा असून, शिक्षणाबरोबरच विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडविले जाते.
नाशिक एज्युकेशन सोसायटीने काळाची पाऊले ओळखून १ जून २००७ रोजी सी. बी. एस. सी. अभ्यासक्रमाच्या नवीन शाळेची मुहुर्त रोवली. शाळेचे नाव हायफ्लायर्स अँकेडमी असे ठेवण्यात आले. श्री. हेमेंद्रभाई कोठारी यांनी १ कोटी रूपयांची देणगी शाळेला दिली आणि शाळेचे नामकरण ‘एम. एस. कोठारी अँकेडमी’ असे करण्यात आले. शाळेच्या वाटचालीतील ह्या गरूडझेपेमुळे शाळेचे ब्रीदवाक्य – ‘बियॉन्ड द होरायझन’ समर्पक वाटते.