Our Schools

श्रीमती रंगुबाई जुन्नरे इग्लिंश मिडीयम प्रायमरी, मॉटिसरी स्कूल, नाशिक

स्थापना – १९७५
विद्यार्थीनी संख्या – ८०५
शिक्षक – १४
शिक्षकेतर कर्मचारी – ५
वर्गसंख्या – १३

ना.ए. सोसायटीच्या वटवृक्षाची एक फांदी होण्याचे भाग्य या शाळेला लाभले.हा ह्या शाळेचा गौरव आहे कै.रंगूबाई जुन्नरे यांचेकडून उदार हसते देणगी म्हणून आग्रारोडवरील एक प्लॉट ना.ए.सोसायटीला मिळाला त्याठिकाणी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून इंग्रजी माध्यमाची ही शाळा सुरू करण्यात आली. २ जुलै १९७५ हा या शाळेचा स्थापनेचा दिवस. ४ वर्ग खोल्यांमध्ये लोअर केजी व हायर केजी हे वर्ग सुरू करण्यात आले. दलित वर्गातील मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे हा उद्देश कै. पांडुरंगजी गायकवाड यांचा ही शाळा सुरू करण्यामागे होता. अनेक शेतकरी व गरीब वर्गातील विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश त्यावेळी इनचार्ज शिक्षिका सौ. रजनी देशपांडे व कर्मचारी श्रीमती देशमुख बाईं ह्या दोघींनी अथक परिश्रमाने ही शाळा नावारूपाला आणली. इ.स. १९७७ ला शाळेच्या पहिनीचा वर्ग सुरू झाला. अशाप्रकारे चौथीपर्यंत वर्ग सुरू होऊन प्राथमिक शाळा पूर्णत्वास आली.
आनंदाची व अभिमानाची गोष्ट म्हणजे सन १९९६-१९९७ या वर्षात शाळेने गुरूवर्य कै. ब.चिं.सहस्त्रबुध्दे आदर्श शाळा हा पुरस्कार मिळवून नाशिक विभागात अग्रगण्य स्थान पटकावले.


शिशुवृंद सागरमल मोदी शाळा, नाशिक








बाल विद्यालय, उंटवाडी ( सिडको), नाशिक