Our Schools

सी. डी. ओ. मेरी हायस्कूल, नाशिक

स्थापना – १९७९
विद्यार्थीनी संख्या – २२६९
शिक्षक – ५१
शिक्षकेतर कर्मचारी – १५
वर्गसंख्या – ३४

सन १९७८ मध्ये मेरी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची मागणी मान्य करुन पेठे विद्यालयाचे स्थलांतरित वर्ग म्हणून चार वर्गांची शाळा संस्थेने सुरू केली. विभाग प्रमुख म्हणून श्री. कुलकर्णी काम पाहू लागले सी. डी. ओ. कार्यालयातील अधिका-यांच्या सहकार्याने शाळेच्या इमारतीच्या बांधकामास सुरूवात झालेली होतीच. ना. प्रा. सदानंद वर्दे यांच्या शुभहस्ते इमारतीचा उदघाटन समारंभ संपन्न झाला. आनंदाची गोष्ट अशी की जून १९७९ पासून शाळेला स्वतंत्र शाळा म्हणून मान्यता मिळाली आणि शाळेची प्रगतीच्या दिशेने मोठया वेगात वाटचाल सुरू झाली.


माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उंटवाडी, सिडको स्कीम-४, नाशिक


स्थापना – १९८७
विद्यार्थीनी संख्या – २२००
शिक्षक – ५२
शिक्षकेतर कर्मचारी – १३
वर्गसंख्या – ३३

सन १९८७ मध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीने शैक्षणिक विकासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला. संस्थेने सिडकोच्या चौथ्या योजनेतील २२ वर्ग व विस्तीर्ण क्रीडागंण असलेली सुसज्ज इमारत विकत घेतली. महानगर पालिकेच्या क्षेत्रात संस्थेने स्वत:च्या मालकीची इमारत विकत घेऊन संस्था शैक्षणिक विकासास सिध्द आहे असे निर्दशनास आणून दिले. दि. ३० एप्रिल १९८७ साली अक्षय तृतीयेच्या शुभदिनी आदरणीय वि. वा. तथा तात्यासाहेब शिरवाडकरांच्या आशिर्वादांसह या इमारतीत प्रवेश केला व माध्यमिक विद्यालय सुरू झाले.


श्रीमती रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडीयम हायस्कूल, नाशिक

rangubai-school


स्थापना – १९७४
विद्यार्थीनी संख्या – ११६०
शिक्षक – ३२
शिक्षकेतर कर्मचारी – १२
वर्गसंख्या – २३

सुमारे २७ वर्षांपुर्वी नाशिक शहरात अगदी मोजक्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा होत्या. शहरातील पालकांना इंग्रजी माध्यमाबरोबरच भारतीय मूल्ये व संस्कार जपणारी शाळा हवी होती. तेव्हा ना. ए. सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी अशी शाळा काढण्याचा विचार केला. संस्थेचे आजीव सभासद कै. ब. चिं. सहस्त्रबुध्दे यांच्या प्रयत्नांनी राजेबहाद्दर वाडयातील काही वर्गात इ. एम. एस. (EMS) या नावाने एक अत्यंत आगळी शाळा सुरू झाली. कै. श्रीमती कमलाताई सोहोनी व सौ. शांता घाणेकर यांनी घरोघर जाऊन मुले गोळा केली व १९६८ मध्ये शाळेची स्थापना झाली. ह्यांच्या जोडीला सौ. नीलम किर्लोस्कर ह्यांची जोड मिळाली व शाळेच्या प्रगतीने वेग घेतला. नंतरच्या काळात माँटेसरी, प्रायमरी व हायस्कूल असे स्वतंत्र विभाग झाले. कै. रंगुबाई जुन्नरे यांनी दिलेल्या जागेत १९८० साली शाळेची सुसज्ज इमारत उभी राहिली व शाळा नव्या इमारतीत भरू लागली. शाळेला शिस्त, स्थैर्य व १००% निकालाची परंपरा मिळाली.