स्थापना – १९२३
विद्यार्थी संख्या – २५१४
शिक्षक – ७१
शिक्षकेतर कर्मचारी – २१
वर्गसंख्या – ४५
पेठे विद्यालय हे नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उगमस्थान आहे. पेठे विद्यालयाचे पूर्वीचे नाव सेंट जॉर्जेस हायस्कूल असे होते. पंच्चाहत्तर वर्षांच्या गौरवशाली इतिहासातील काही समारंभ व सोहळे कायम लक्षात रहावेत असे आहेत. १५ जानेवारी १९४४ रोजी शाळेने ‘पेठे विद्यालय’ या नावाने नवीन वास्तूत प्रवेश केला. १९४८- ४९ या वर्षी शाळेने मा.ना.बाळासाहेब खेर, मुख्यमंत्री, मुंबई राज्य यांच्या अध्यक्षतेखाली रौप्य महोत्सव साजरा केला. १९७३-७४ मध्ये आदरणीय वि. वा. तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांचे शुभहस्ते सुवर्णमहोत्सवी सोहळा संपन्न झाला.
स्थापना – १९४६
विद्यार्थीनी संख्या – २६४०
शिक्षक – ७१
शिक्षकेतर कर्मचारी – २०
वर्गसंख्या – ४५
केवळ मुलींसाठी सुरू केलेली नाशिक जिल्ह्यातील ही पहिली शाळा.सन १९२३ मध्ये स्थापन झालेल्या ना.ए.सोसायटीच्या सेंट जॉर्जेस हायस्कूलचे सन १९४४ मध्य ‘पेठे विद्यालय’ असे नामकरण झाले. १९४५ पर्यंत विद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र शिकत असत. विद्यार्थिनींची संख्या वाढल्याने जून १९४६ मध्ये ‘शारदा मंदिर’ या नावाने मुलींची स्वतंत्र शाळा संस्थेने सुरू केली. प्रांरभी ५ वी ते ८ वी चे वर्ग व नंतर तीन वर्ग असे ५ वर्ग सुरू केले. शाळेत पहिले मुख्याध्यापक होण्याचा मान कै. रा. के. वैद्य यांना मिळाला. अभ्यासविषयांबरोबरच शिवण, गायन, सूत कताई हे विविध विषय शिकवले जात. १९५२ मध्ये विद्यार्थिनीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल पन्नास टक्के लागला. आर्थिक अडचणी, नियमांची बंधने व जागेची चणचण अशा अनेक अडचणींना तोंड देत शाळेची वाटचाल सुरू होती. १९५५ मध्ये शाळेस स्वतंत्र प्रयोगशाळा मिळाली. मुलींची संख्या १००० पर्यंत पोहचली. राजेबहाद्दर वाडयाची जागा अपूरी पडू लागली. १९६० साली संस्थेचे अध्यक्ष खा. गो.ह.देशपांडे यांच्या प्रयत्नांनी शाळेला इमारतीसाठी जागा मिळाली. सरकारकडून ५०,००० चे इमारत अनुदान मिळाले. १९६३ मध्ये शाळा नव्या इमारतीत स्थलांतरित झाली. नवीन इमारतीचा उदघाटन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. वसंतरावजी नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. शाळेच्या इतिहासातील हा सुवर्णदिनच. १९६४ मध्ये देवकिसनजी सारडा यांनी मातोश्री रामप्यारीबाई सारडा यांच्या नावाने रू. ६०,००० ची देणगी दिली. ‘शारदा मंदिरा’चे ‘मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्या मंदिर’ असे नामकरण झाले.