१९२३ ते आजपर्यंतच्या १०२ वर्षांच्या काळात नाशिक एज्युकेशन सोसायटीने अनेक स्थित्यंतरे अनुभवली.वेळोवेळी लाभलेले उत्साही, धैर्यशील, कर्तृत्ववान संस्थाचालक तसेच व्यासंगी आणि स्वतःला झोकून देऊन त्यागमय जीवन व्यतीत करणाऱ्या शिक्षकांमुळे आणि पुढे नामवंत व कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांमुळे संस्था प्रगतीकडे वाटचाल करू शकली.
माजी विद्यार्थी ते संस्था अध्यक्ष अशा विविध भूमिकांमधून नाशिक एज्युकेशन सोसायटीशी जवळपास ५० वर्षांपेक्षाही जास्त काळ संबंधित असलेले प्रा. सूर्यकांत रहाळकर यांचे गतवर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. संस्थेसाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. परंपरांचे जतन करून संस्थेला आधुनिक दृष्टी प्रदान करण्याचे काम प्रा. रहाळकर सरांनी केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन १३ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वतीने भविष्यातील शिक्षण आणि शिक्षक या विषयावर जेष्ठ विचारवंत मा.श्री अविनाश धर्माधिकारी, पुणे यांचे व्याख्यान सकाळी ११ ते २ या वेळेत परशुराम साईखेडकर नाट्यगृह, नेहरू गार्डन समोर, नाशिक येथे आयोजित केले आहे.
आपण व्याख्यानाचा जरूर लाभ घ्यावा, ही विनंती.
Towards 100 years of journey of success
Established in 1923 Nashik Education Society is one of the premiere educational institutes of Nashik. With nearing 25000 students and over 550 teachers and 350 support staff Nashik Education Society is trying hard for bringing about quality education for all sections of the society.
An important feature of N.E. Society is the democratic pattern of management it has followed. It is probably the only educational institution in the entire country where every teacher after completion of 10 years becomes a member and is eligible to participate in its management. Even the non teachers are empowered to participate in the management of the institution.